ओला टॅक्सीची तीन शाळकरी मुलांना धडक
By admin | Published: January 17, 2017 02:36 AM2017-01-17T02:36:00+5:302017-01-17T06:23:03+5:30
शिकाऊ चालकाने शाळेत जात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना, सोमवारी सकाळी मानखुर्द परिसरात घडली आहे
नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल क्रिकेट हंगाम सहावा या महोत्सवातील उपांत्य फेरीच्या सामन्यांना गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. दुपारी साडेबारा वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना नाशिक चॅलेंजर्स विरुद्ध अथर्व रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्हीही संघादरम्यान बुधवारीच अटीतटीचा सामना झाला. यात नाशिक चॅलेंजर्सच्या प्रशांत नाठे याने उत्कृष्ट खेळ क रीत अथर्व रॉयल्सच्या हातातील सामना खेचून चॅलेंजर्सला विजय मिळवून दिला. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता संदीप फाल्कन्स विरुद्ध भदाणेज् हायटेक टायगर्स यांच्यात होणार आहे.
बुधवारी सायंकाळी नाशिक चॅलेंजर्सचा प्रशांत नाठे याने ४६ चेंडूत ७ षटकार व २ चौकारांच्या साहाय्याने ७२ धावा करून सामनावीर होण्याचा मान मिळविला. याच दोन्ही संघांतील खेळाडूंचा खेळ गुरुवारी दुपारी होणार्या सामन्यात बघायला मिळणार आहे. प्रशांत नाठेसह स्वत: कर्णधार यासर शेख, घनश्याम देशमुख आदि उत्तम खेळाडू नाशिक चॅलेंजर्सची जमेची बाजू आहेत. तर अथर्व रॉयल्सकडे कर्णधार वैभव केंदळे, स्वप्नील राठोड, कपिल शिरसाठ, तेजस पवार आदि उत्तम खेळाडू आहेत. (प्रतिनिधी)
कोट...२८पीएचडिसी७३
लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत सलग तीन वर्षेे एनपीएल चषक जिंकण्याचा मान नाशिक चॅलेंजर्स या संघाने मिळविला आहे. आमच्याकडे प्रशांत नाठेसारखे सामना फिरविणारे अनेक खेळाडू आहेत. खेळाडूंना आम्ही मैदानावर खेळण्यापूर्वी प्रोत्साहन व सामना जिंकण्यासाठी मनोधैर्य दिले होते. आजच्याही सामन्यात आमचे खेळाडू बुधवारी सायंकाळी केली तशीच अष्टपैलू कामगिरी करतील.
-नेहा पटेल, संघमालक नाशिक चॅलेंजर्स
कोट...२८पीएचडीसी७४
लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत अथर्व रॉयल्सच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करून अंतिम सामन्यातही आमचे खेळाडू दर्जेदार खेळ करून नाशिककरांना उत्तम क्रिकेटचे प्रदर्शन दाखवतील याचा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक सामन्यात आम्ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उतरलो. उपांत्य फेरीत आमचे खेळाडू चांगला खेळ करून एनपीएल चषकावर दावा सांगतील असा विश्वास वाटतो.
- क्रांती गोरे, संघमालक, अथर्व रॉयल्स.