जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:10 PM2020-07-11T19:10:24+5:302020-07-11T19:16:34+5:30
कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
नाशिक : कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
दरम्यान, ऐन हंगामात कृषी विक्रे त्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली असून, या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी जूनमध्येच चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीनची पेरणी केली; मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्र ारी झाल्या. यामुळे कृषी विभागाने मोहीम राबवून नमुने घेतले. काही ठिकाणी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईविरोधात राज्यभरातील विक्रे त्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. कोणताही विक्रे ता बियाणे किंवा खते बनवत नाही ते फक्त प्रमाणित बियाणे विकतात. यामुळे बियाणे उगवले नाही, तर विक्रे त्यांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे संघटनेचे मत आहे. कृषी विभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी कृषी आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाले असल्याची माहिती नाशिक अग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान खैरनार यांनी दिली.जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन हजार विक्रेते यात सहभागी झाले आहेत. एखादे बियाणे उगवले नाही तर त्यात विक्रे त्यांचा काय दोष, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अयोग्य असून, हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. बंदमुळे शेतक-यांची गैरसोय होत असल्याने याचा शासनाने विचार करावा.