तीन हजार चालक वाहकांचा रोजच एक लाख प्रवाशांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:51+5:302021-02-24T04:15:51+5:30
नाशिक: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या चालक वाहकांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. रोजच्या प्रवासात अनेक ...
नाशिक: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या चालक वाहकांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. रोजच्या प्रवासात अनेक गावे आणि प्रवाशांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना सर्वाधिक धोका पत्करून सेवा बजवावी लागते. आता पुन्हा कोरेानाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चालक वाहकांचा धोका देखील वाढला आहे. महामंडळाकडून सुरक्षिततेची कोणतीही साधने पुरविली जात नसल्याने त्यांना स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी लागत आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महामंडळाला आणि त्यातील चालक वाहकांना बसला आहे. एस.टी. महामंडळातील चालक वाहकांची संख्या अधिक असल्याने फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या या चालक वाहकांना सर्वाधिक फटका बसला आहे. कोरेानाच्या काळात बसेस बंद असतांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू झालेल्या काही बसेससाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागले. परप्रांतीय प्रवासी वाहतूक करण्यासाठी त्यांना याच काळात मोठी जबाबदारी पार पाडावी लागली. यातून अनेक चालक वाहकांना कोरोनाची देखील लागण झाली.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात सुमारे चार हजार चालक आणि वाहकांची संख्या आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के कर्मचारी अनेकविध कारणांनी रजेवर राहतात. काही चालक हे मुंबईत बेस्टच्या सेवेला मदत करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन हजार चालक वाहकांना दररोज लाखो प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून दररोज एक ते सव्वालाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यांचा संपर्क जिल्ह्यातील तेरा डेपोमंधील चालक वाहकांशी येतो.
--इन्फो--
२१०० चालक
१९०० वाहक
--- रोजच्या फेऱ्या
--इन्फेा--
१ लाख १५ हजार प्रवाशांचा रोजचा प्रवास
जिल्ह्यातील १३ डेपोमधून ६६७ बसेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या बसेसमधून दररोज सुमारे १ लाख १५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात. सुटीच्या दिवशी तर प्रवासी संख्या १ लाख ४० हजारापर्यंत देखील पोहचली आहे. नाशिमधून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रवासी आपली काळजी घेत आहेच, चालक वाहकांना देखील स्वता:ची काळजी घ्यावी लागत आहे. दररोजच्या प्रवासात चालक वाहकांचा दररोज हजारो लोकांशी संपर्क येतो.
--इन्फो--
तपासणी होतच नाही
दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक वाहकांची राज्य परिहवन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. किंबहूना मुंबईत सेवा बजावून आलेल्या चालकवाहकांची देखील कोणतीही तपासणी केली जात नाही. परजिल्ह्यातून आलेल्या चालकांना जिल्ह्यातील ड्युटी लागलीच दिली जाते. आवश्यकता किंवा शंका वाटली तर त्या संबंधित चालक वाहकांनी स्वत:ची तपासणी करवून घ्यावी असे महामंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.
--इन्फो--
लसीकरण होणार कधी?
दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस.टी. चालक वाहकांना लसबाबतचा कोणताही विषय आजवर झालेला नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्यात यावी अशी मागणी आहे परंतु अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आलेले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेलला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अद्याप मिळालेले नाही.
--इन्फो--
मास्क, सॅनिटायझर नसल्याचे गैरसोय
चालकांना एकदा मास्क, सॅनिटायझर पुरविले जात नसल्याने चालक वाहकांना स्वत:च व्यवस्था करावी लागते. काही चालक मास्क वापरताता, काही आजिबात वापरत नाही तर काही केवळ तोंडाला रूमाल बांधतात. वाहकांना प्रवाशांचे तिकीट काढतांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वाहक मास्क वापरतांना दिसतात.
--कोट--
दररोज प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने धोका असतोच परंतु ड्युटी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वत:ची काळजी घेऊन ड्युटी करावी लागते. कधी खूप प्रवासी असतात तर कधी फारसा प्रतिसाद नसतो. सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या वाढलेली असते. त्यांच्यात राहूनच काम करावे लागते. एस.टी. सुरळीत सुरू राहिली पाहिजे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी ड्युटी करावीच लागणार आहे.
- धनंजय राऊत , वाहक
--कोट--
चालकाचा संबंध थेट प्रवाशांशी येत नसला तरी प्रवासी घेऊन जातांना प्रत्यक्ष संपर्क येतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा, तसेच स्थानकातून येजा करण्याचा धोका पत्करून काम करावे लागते. प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात रूग्ण आहेत, परिस्थिती वेगळी असते. कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. धोका ओळखून काम करावे लागते.
- आनंद कुराडे, चालक
- इन्फो--
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू बसेस मार्गावर आलेल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढत असतांनाच आता पुन्हा केरोनाचे संकट उभे राहिले आहे. सध्या मिळणाऱ्या उतपन्नातून किमान विभागाचा खर्च भागविला जात आहे. उत्पन्न कमी झाले तर काही बसेस पुन्हा कमी करण्याची शक्यता आहे. शासनाने दिलेल्या अनुदानातून एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकेल. मात्र परिस्थिती सुधारली नाही तर संकट अधिक वाढू शकते. त्यामुळे अनिश्चितेची टांगती तलवार कायम आहे.