मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार
By शांतीलाल गायकवाड | Published: July 20, 2020 12:47 AM2020-07-20T00:47:06+5:302020-07-20T00:48:51+5:30
मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
मालेगाव : शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
शहरात चारचाकी, अॅपेवर भंगार गोळा करणारे अनेक आहेत. पिकअपवर नामपूर, चांदवड भागात जाऊन शेतकऱ्यांकडून भंगार गोळा केले जाते तर काही शहरात गल्लीबोळात फिरून भंगार जमा करतात. मोठ्या दुकानदारांना ते भंगार विकतात. भंगार खरेदी करण्यासाठी मोठे दुकानदार त्यांना दराने पैसे देतात नंतर लोखंड, पत्रा, प्लॅस्टिक वेगवेगळ्या भागात एकत्र केले जातात. शेतकºयांसह ड्रॉपनळी, तुटकी शेती अवजारे खरेदी केली जातात. एक भंगार खरेदी करणारा दिवसभरात तीनशे ते दीड हजार रुपये कमावतो. चारचाकीवाला ५०० रुपये रोज तर अॅपेवाला दीड हजार रुपये रोज कमवतो. चार महिने लॉकडाऊनमध्ये भंगार विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. त्यांना पर्यायी काम मिळाले नाही.