पाळे बुद्रुक परिसरात कोरोनाचे तीन रु ग्ण पॉॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:03 PM2020-08-09T17:03:12+5:302020-08-09T17:04:23+5:30
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक परिसरात काल तीन रु ग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांना कोविड सेंटर, मानूर मध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर येथेच उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

यात एक महिला (७५) व दोन पुरु ष अनुक्र मे ४० वर्ष व २० वर्ष वय आहे. पाळे बुद्रुक व पाळे खुर्द गावात फक्त गिरणा नदीचे अंतर आहे. असे असताना देखील पाळे खुर्द ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असुन कुठली रोगप्रतिबंधक व्यवस्था येथे केलेले नाही.
पाळे खुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या प्रकाराकडे काना डोळा केला आहे. कुठलेही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न करता पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक गावातील गल्ली व चौकाचे नामकरण करण्यासाठी ही मंडळी दंग असल्याचे आढळून आले आहे. गल्ली चौकाचे नामकरण करते वेळी या मंडळींनी कुठेही मास्क तोंडाला लावले नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले आहे.
पाळे परिसरात कोरोनाचे आगमन झाले त्यावर उपाय योजना व प्रतिबंधक यासाठी एकही पदाधिकारी पुढे सरसावलेला नाही. ना ग्रामसेवक तलाठी यांनी गावात हजेरी लावली नाही. आरोग्य विभागानेही कुठलीच दखल घेतली नाही.
सद्यस्थितीत गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारी तुंबल्या आहेत. पडीक प्लॉटमध्ये गवताचे साम्राज्य आहे. कुठल्याही प्रकारची रोग प्रतिबंधक फवारणी गावात ग्रामपंचायत विभागाकडून अथवा आरोग्य विभागाकडून केलेली नाही.
पाळे खुर्द येथे भर चौकात जमेला कचरा व घाण.