तीन वाहनांचा अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 06:11 PM2019-06-23T18:11:19+5:302019-06-23T18:11:37+5:30

सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात शहापूरजवळ रविवारी (दि.२३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत.

Three vehicle accidents, one killed | तीन वाहनांचा अपघात, एक ठार

तीन वाहनांचा अपघात, एक ठार

Next
ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी महामार्ग : दातलीत तीन महिलांसह चार जखमी

सिन्नर-शिर्डी महामागार्वर दातली शिवारात झालेल्या अपघातातील चक्काचूर झालेली कार व गॅस कंटेनर
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात शहापूरजवळ रविवारी (दि.२३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत. अपघातात गॅस कंटेनर, असेंट कार व स्विफ्ट डिझायर कार या वाहनांचा समावेश असून त्यात असेंट कारचा चक्काचूर झाला आहे.
सिन्नर - शिर्डी महामार्गावरील दातली फाट्याजवळील शहापूर येथील रामेश्वर लॉन्सजवळ सदरचा अपघात घडला. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अपघातात असेंट कारमधील चालक प्रवीण सोना जाधव (३२) रा. समतानगर नाशिक हे मृत्युमुखी पडले. तर त्याच कारमधील वंश राजेश नेभवाणी (१८), शिलू राजेश नेभवानी (४५), क्रशा राजेश नेभवानी व लता मुरलीधर कृष्णाणी (६०) सर्व राहणार ड्रिम फ्लॉवर, टाकळी रोड, नाशिक हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर गुरूळे, लक्ष्मण बदादे, किशोर सानप, आबा शेळके आदी पुढील तपास करीत आहेत.
अपघातात कारचा चक्काचूर
सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शिर्डीकडून सिन्नरकडे येणारा गॅस कंटेनरने (क्र. एम. एच. ०४ जे. के. १६७८) त्याच दरम्यान सिन्नरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार (क्र. एम. एच. १५ ई. पी. ८४९७) ला धडक दिली. स्विफ्टकारच्या पाठीमागून येणाºया असेंट कार (क्र. एम. एच. १५ ई. पी. १८०७) ला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तसेच क्रेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले.

Web Title: Three vehicle accidents, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.