एसटी महामंडळाकडून तीन गावांना टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:57 PM2019-05-20T17:57:59+5:302019-05-20T17:58:51+5:30
सिन्नर : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचीही भर पडली आहे. त्यांनी सिन्नर तालुक्यातील मनेगाव, पाटोळे, रामनगर ही ३ गावे दत्तक घेतली असून त्यांना पाऊस पडेपर्यंत दररोज १ टँकर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
मनेगाव येथे रविवारी (दि.१९) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत स्थापन झालेल्या न्यासाअंतर्गत हा उपक्र म सुरु केला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्यासह नाशिक विभाग नियंत्रक नितीन मैंद, वाहतूक अधिकारी सिया, कार्यकारी अभियंता काजी, नगरचे विभागीय नियंत्रक गिते, आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, प्रमोद घोलप, अॅड. संजय सोनवणे, अॅड. सी. डी. भोजणे, पोलीस पाटील रवींद्र सोनवणे, रमेश सोनवणे, तानाजी शिंदे, जगन खोळंबे, सुहास जाधव, रामा बुचूडे, राजाराम मुरकूटे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.