आदिवासी भागातील तीन गावांचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:13 AM2019-01-06T01:13:04+5:302019-01-06T01:13:37+5:30
नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरमच्या टॅँकरमुक्त गाव या अभियानास राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून १४.५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन गावांना पाणीटंचाईतून मुक्तता मिळणार आहे.
नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरमच्या टॅँकरमुक्त गाव या अभियानास राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून १४.५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन गावांना पाणीटंचाईतून मुक्तता मिळणार आहे.
तीन वर्षांपासून सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था टंचाईग्रस्त आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून, आजवर अनेक गावांना टँकरमुक्त केले आहे. यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा या गावचा पाणीप्रश्न फोरमने सोडवल्यावर या योजनेचे लोकार्पण खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले होते.
कोणत्याही यंत्रणांच्या दृष्टिक्षेपात नसलेल्या या गावात धड रस्ताही नव्हता. इतक्या दुर्गम भागातील गावाचा पाणीप्रश्न एका सामाजिक संस्थेने सोडवल्याची माहिती मिळाल्यावर खासदार सहस्त्रबुद्धे लोकार्पण सोहळ्याला हजर राहिले होते.
त्यांनी कार्यक्र मातच पुढील काही गावांसाठी खासदार निधीतून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता करून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तीन गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी साडे चौदा लाख
रु पयांचा निधी मंजूर केला आहे.
खासदार निधी विनियोगाच्या प्रक्रि येप्रमाणे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास सदर पत्र प्राप्त झाले असून जिल्हा परिषदेच्या पाणी विभागामार्फत या पत्रावर कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे.ज्या गावात रस्ताही नाही तिथे सोशल नेटवर्किंग फोरमने पाण्याची समस्या सोडवल्याचे बघून आनंद वाटला. त्यासाठीच तीन गावांना खासदार निधीतून मदत केली. आता नाशिकच्या प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून तीनही गावांना उन्हाळ्याच्या आत पाणी द्यावे.
- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, राज्यसभा सदस्य