राणेनगर, गोविंदनगर परिसरात तीन महिलांची पोत खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:30 AM2018-09-29T00:30:40+5:302018-09-29T00:30:55+5:30

सिडकोतील राजीवनगर तसेच मुंबई नाका परिसरातील गोविंदनगरमधून जात असलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ शहरात सोनसाखळी चोरटे सुसाट सुटले असून, पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेत आहेत़

Three women shipwrecks in Ranenagar, Govindnagar area | राणेनगर, गोविंदनगर परिसरात तीन महिलांची पोत खेचली

राणेनगर, गोविंदनगर परिसरात तीन महिलांची पोत खेचली

googlenewsNext

नाशिक : सिडकोतील राजीवनगर तसेच मुंबई नाका परिसरातील गोविंदनगरमधून जात असलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ शहरात सोनसाखळी चोरटे सुसाट सुटले असून, पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेत आहेत़ या सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलावर्गाकडून केली जाते आहे़  राजीवनगर परिसरातील सूयश पार्कमधील रहिवासी कंचन रमणलाल जाधव या राणेनगरच्या किशोरनगर भागातील भवानी किराणा दुकानासमोरून पायी जात होत्या. यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी जाधव यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़, तर या परिसरातून जात असलेल्या रंजना कडनोर यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून नेली. सोनसाखळी चोरट्यांनी एकूण ८० हजार रुपयांचे सोन्याची पोत खेचून नेली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोनसाखळी चोरीची तिसरी घटना मुंबई नाक्यावरील गोविंदनगरजवळ असलेल्या मनोहरनगर येथे घडली़ सिडकोतील राणाप्रताप चौकातील रहिवासी शिखा शिवप्रसाद दत्ता या मनोहरनगरमधील बहिणीस भेटण्यासाठी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी शिखा यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून नेली़

Web Title: Three women shipwrecks in Ranenagar, Govindnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.