तीन महिलांची प्रकृती खालावली
By admin | Published: September 9, 2016 12:52 AM2016-09-09T00:52:19+5:302016-09-09T00:53:26+5:30
बिलपुरी : ंविवाहितेच्या खून प्रकरणी गावागावात साखळी उपोषण करण्याचा निर्णय
सटाणा : गोराणे येथील विवाहितेचे खून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे सहायक पोलीस उपअधीक्षक व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आज गुरु वारी दुसऱ्या दिवशीही बिलपुरी येथील सातशे ते आठशे महिला व पुरुषांचे आमरण उपोषण सुरूच होते. उपोषणकर्त्यांपैकी तीन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना नामपूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान खून प्रकरण दडपून आरोपीला सहकार्य करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने उद्यापासून पंचक्रोशीतील ग्रामस्थ गावागावात साखळी उपोषण करणार असून येत्या तेरा तारखेला विवाहितेच्या नातेवाइकांसह डॉ. शेषराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणास बसणार असल्याचा निर्णय आज घेतला आहे. बागलाण तालुक्यातील गोराणे येथील विवाहिता सविता देसले (२७) ही माहेरी बिलपुरी येथे असताना पती अरविंद श्रावण देसले याने गेल्या २६ जुलैला रात्री सविताला गोराणे येथे घेऊन चाललो असे सांगून एका अज्ञात ठिकाणी तिचा खून करून आसखेडा- गोराणे रस्त्यावर अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे; मात्र जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, सहायक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून खुनी आरोपीला सहकार्य करण्याचा प्रयत्न केल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही संपूर्ण गाव उपोषणाला बसल्यामुळे गावात शुकशुकाट होता. तर मृत सविताला न्याय मिळावा म्हणून गावातील आपल्या वडीलधारी मंडळी सोबत शाळकरी मुलेही उपोषणास बसल्यामुळे येथील शाळा ओस पडल्याचे चित्र बघायला मिळाले. दुसरीकडे उपोषण- कर्त्यांकडे अद्याप तहसीलदार सुनील सौंदाणे वगळता एकही अधिकारी फिरकला नाही. दुसऱ्या दिवशीही गावातील जनावरांचे चारापाण्याअभावी मोठे हाल आहेत. (वार्ताहर) (वउपोषणकर्त्यांमध्ये जेष्टांचा मोठा सहभाग आहे. बुधवार पासून अन्न ,पाण्याचा त्याग केल्यामुळे बहुतांश उपोषणकर्त्यांना अशक्तपणा आला असून आज सायंकाळी नामपूर येथील ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय पथक बिलपुरीत दाखल झाले होते .वैद्यकीय तपासणी दरम्यान तीन महिला उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.उपोषणास सरपंच सतीश पवार ,धनंजय पवार ,शशी पवार ,प्रफुल्ल पवार ,किरण पवार ,पंढरीनाथ पवार ,जगदीश पवार ,मनोहर पवार ,अविनाश पवार ,किशोर पवार ,साहेबराव पवार ,विठ्ठल पवार ,नथू पवार ,यशवंत अिहरे ,संतोष अिहरे ,मधुकर ठाकरे ,संजय गायकवाड ,निर्मला पवार ,मनीषा पवार ,रत्नाबाई पवार ,भिकूबाई पवार ,इंदुबाई पवार ,योगिता पवार ,सरला पवार ,अर्चना पवार ,लता पवार ,मीना पवार ,लीना पवार ,सरला पवार ,कल्पना पवार ,जिजा पवार ,तनुजा पवार ,पूनम पवार मंगला पवार ,शोभा पवार ,भागाबाई पवार सुशीला पवार यांच्यासह महिला ,पुरु ष ,लहान मुले मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)