शालेय मुलीची छेड काडणाऱ्यास तीन वर्षे सश्रम कारावास(टिप- बातमीत दिलेल्या दंडाच्या रकमेबद्दल शंका वाटतेय, एका ठिकाणी २२रुपये व दुसऱ्या ठिकाणी २००० रुपये दिलेली आहे. वाक्ये बोल्ड केलेली आहेत, कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:05+5:302021-02-14T04:14:05+5:30
नाशिक : शहरातील एका शालेय मुलीचा रस्ता अडवून तिची छेड काढून उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा ...
नाशिक : शहरातील एका शालेय मुलीचा रस्ता अडवून तिची छेड काढून उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व २२ रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
भद्रकाली पोलीस ठाणेच्या हद्दीत दि. १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी दुपारी ०२.३०वा सुमारास व त्यापूर्वी २/३ दिवस आगोदर पीडित मुलीला जुनेद तबारक चौधरी (२३, रा. काठे गल्ली) यांने आदर्श शाळेच्या गेटमधून सीबीएसकडे बाहेर निघत असताना फिर्यादीस रस्त्यात अडवून, फ्रेंडशिपची मागणी करत एकांतात भेटण्यास सांगितले, तसेच तिचा पाठलाग करीत अश्लील इशारे करून पीडितेला उचलून नेण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात आरोपी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने, तब्बल पाच वर्षांनी आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व २,००० रु. दंड व दंड न भरल्यास २ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.