चोर समजून युवकाचा खून करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:41 PM2018-09-04T23:41:55+5:302018-09-04T23:43:29+5:30
नाशिक : चोर समजून केलेल्या मारहाणीत श्याम श्रीराम चकोर (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात घडली होती़ या प्रकरणातील आरोपी फुलन रामभवन राय, राधिका फुलन राय, रामविलास शिवपुंजन राय (सर्व रा. परमोरी शिवार, बॉटल कंपनी गोदाम, ता. दिंडोरी. मूळ रा. दिवाकलपूर पोस्ट नरैना, ता. सकलडिया, जि. चांदोली, उत्तर प्रदेश) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी मंगळवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

मयत श्याम चकोर याची आई लीलाबाई चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा श्याम हा २३ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी आतेभावासमवेत लखमापूर फाट्यावर जाऊन रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी परतला होता़ रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेर झोपला होता, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तो आढळून आला नाही़ तसेच दुसºया दिवशी परमोरी शिवारातील बॉटल कंपनीच्या गुदामाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिघा संशयितांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अॅड़ रवींद्र निकम यांनी अकरा साक्षीदार तपासले़ यामध्ये खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नसला तरी मुख्य आरोपी फुलन राय याने दोन साक्षीदारांना केलेल्या फोनवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शाबीत झाला़ या तिघांनाही पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे़