भाविकांची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:56 AM2018-11-22T00:56:36+5:302018-11-22T00:57:07+5:30
त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलास दुचाकीवरून येत मारहाण करून लुटणाºया तिघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली़ राहुल निवृत्ती तुपलोंढे (२२, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश हिरामण पारधी (२३, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), अक्षय संजय धोंगडे (२४, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे़ पोलिसांनी या संशयितांकडून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़
नाशिक : त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलास दुचाकीवरून येत मारहाण करून लुटणाºया तिघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली़ राहुल निवृत्ती तुपलोंढे (२२, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश हिरामण पारधी (२३, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), अक्षय संजय धोंगडे (२४, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे़ पोलिसांनी या संशयितांकडून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील वकील सत्यम हरबन्सलाल अरोरा (रा. रामप्रस्थ, जि. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) हे २४ आॅक्टोबर २०१८ रोजी त्र्यंबकेश्वरला पूजाविधीसाठी आले होते़ स्वामी समर्थ कमान ते गुरुद्वारा या परिरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला होता़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, नवनाथ गुरुळे, चंद्रभान जाधव, राजू दिवटे, जालिंदर खराटे, संदीप हांडगे, लहू भावनाथ, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने ही कारवाई केली़
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे या दोन्हींकडून सुरू असलेल्या तपासात गुन्हे शाखेला एका संशयिताची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली़ त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़