बस मोटारसायकल अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 10:59 AM2023-06-27T10:59:41+5:302023-06-27T11:00:19+5:30
याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गणेश शेवरे
पिंपळगाव बसवन्त (नाशिक) - चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने पिंपळगावकडे येणाऱ्या बसने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तीन युवकांचा डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे राहणार तिघेही शिरवाडे वणी फाट्यावर हे उभ्या असलेल्या हिरो पॅशन प्रो कंपनीची मोटार सायकल क्रं. एम एच MH- 17BR-7972 जवळ उभे होते. तेव्हा चांदवड बाजूकडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एस. टी. बस क्रमांक एम एच-२० बी.एल -२४६१ ने मोटार सायकलला जोरदार ठोस मारली.
अपघातात महेश चंद्रकांत निफाडे,सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे यांच्या डोक्यास, छातीस, हातापायास, गंभीर दुखापत झाल्यावर त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर तात्काळ रुग्णवाहिकेतून प्रथमेश पावले यांनी जखमींना पिंपळगाव रुग्णालयात प्राथमिक रुग्णाल दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या अपघाताचा पिंपळगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर कारभारी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बस चालक दिपक शांताराम पाटील (राहणार धरनगांव, जिल्हा जळगाव) हा दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असून अपघाताची माहिती न देता पळून गेला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवलदार शांताराम निंबेकर करत आहेत.
--------
सदर घटना झाल्यानंतर शिरवाडे वणी येथील गावकऱ्यांनी शिरवाडे फाट्या येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरवाडी येथील नागरिक जमा झाले आहेत.