९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:26 AM2019-08-20T01:26:01+5:302019-08-20T01:26:52+5:30

वण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

Thrimbakwari by bus of 90 thousand devotees | ९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

Next

नाशिक : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १८ ते सोमवार, दि. १९ रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रविवारी सकाळपासूनच महामंडळाने ३०० बसेसचे नियोजन केले होते. शहरातील ईदगाह मैदान येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकातून त्र्यंबकेश्वरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबर शहरातील नाशिकरोड, भगूर, पंचवटी, सातपूर येथील स्थानकांमधूनदेखील बसेस सोडण्यात आल्यामुळे ईदगाह मैदानावरील ताण काही प्रमाणात कमी झाला. रविवारी दुपारनंतर ईदगाह मैदान येथून सोडण्यात आलेल्या बसेस सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होत्या. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
रविवारी सायंकाळी भाविकांचा ओघ सुरू झाला आणि रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांची स्थानकावर गर्दी होत होती. त्र्यंबकेश्वरला थेट बस जात असल्याने भाविकांनीदेखील बसनेच जाण्याला प्राधान्य दिले. रविवारी पहाटेपर्यंत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सोमवारी पहाटेपासून भाविकांना परतीचे वेध लागले होते. परतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने ईदगाह मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यंदा प्रवासी घटले
दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. साधारणपणे दुसºया आणि तिसºया सोमवारी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यंदा मात्र प्रवासी संख्या कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरवर्षी साधारणपणे एक लाखाच्या पुढे भाविक नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे जातात. परंतु फक्त ईदगाह स्थानकातून २० ते २५ हजार भाविकांनी प्रवास केला.
सलग सुट्यांमुळे प्रवासी कमी
दरवर्षी होणाºया गर्दीचा उच्चांक लक्षात घेता यंदा तुलनेत भाविकांची संख्या कमीच होती. सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे भाविकांनी सुट्यांमध्येच दर्शन घेतल्याचे बोलले जाते तर काही भाविक तीन ते चार दिवसांपासूनच मुक्कामी होते. त्यामुळेदेखील बसने प्रवास करणाºया भाविकांनी संख्या कमीच होती. रविवार सायंकाळपर्यंत साधारणपणे ३० हजार, तर दुसºया दिवशीदेखील १७ हजार भाविकांनी प्रवास केला. तर तितक्याच संख्येने भाविकांनी परतीचा प्रवास केला. ही आकडेवारी केवळ ईदगाह मैदान येथील स्थानकातून असून अन्य स्थानकातूनदेखील भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या बसने प्रवास केला. या सर्व स्थानकामंधून जवळपास लाखभर भाविक त्र्यंबककडे रवाना झाले.
सलग दोन दिवस नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहतूक करण्यात आली. या कालावधीत कुठेही भाविकांना गर्दीचा त्रास झाला नाही शिवाय भाविकांनी शक्यतो बसूनच प्रवास करावा यासाठी दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून दिली जात होती. विभाग नियंत्रक नितीन मंैद आणि विभागीय वाहतूक अधिकारी उत्तम पाटील यांनी केलेल्या नियोजनानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी काटेकोर सेवा बजावली.
- व्ही. व्ही. निकम, सहायक वाहतूक अधिकारी.

Web Title: Thrimbakwari by bus of 90 thousand devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.