योग-प्राणायामाच्या माध्यमातून अनेक आजारांवर मात शक्य
By admin | Published: September 7, 2015 10:33 PM2015-09-07T22:33:20+5:302015-09-07T22:35:09+5:30
स्वामी आनंदगिरी महाराज यांचा डॉक्टरांशी संवाद
नाशिक : योग-प्राणायामाच्या माध्यमातून अनेक आजार बरे करता येतात, असे प्रतिपादन प्रयाग येथील योगगुरू आनंदगिरी महाराज यांनी केले. येथील चोप्रा लॉन्स येथे सुरू असलेल्या योग शिबिरात ते शहरातील डॉक्टरांशी संवाद साधत होते.
डॉक्टरांसाठी खास योग शिबिर घेण्यात आल्याने शहरातील अनेक डॉक्टरांनी त्याचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी योग-प्राणायामाच्या माध्यमातून आजार कसे बरे करता येतात, यावर संवाद साधला. डॉक्टरांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. याप्रसंगी सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब अहेर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. कांचन देसरडा, केंद्रीय आयुर्वेद परिषद सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात, नाशिक जिल्हा होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे, निमा मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. अभिनंदन कोठारी, केंद्रीय होमिओपॅथी परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एच. एम. देसरडा, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अजय वाघ, डॉ. नीलेश कुंभारे, डॉ. सुदर्शन मालसाने आदि डॉक्टर उपस्थित होते. सदर योग शिबिर दि. २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कुंभपर्वात योग प्रचाराच्या निमित्ताने योग शिबिर नागरिकांसाठी मोफत आहे. शिबिरात दररोज सकाळी ६ ते ८ योग-प्राणायाम तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ६ यज्ञ, देवतापूजन, रुद्राभिषेक हवन आदि कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९ भजन, असे कार्यक्रम सुरू आहेत. (प्रतिनिधी)