भाव नसल्याने भोपळा दिला फेकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:07 PM2021-03-01T19:07:44+5:302021-03-01T19:09:16+5:30
पिंपळगाव लेप : सध्या भोपळ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भोपळा अक्षरश: फेकून द्यावा लागत आहे.
पिंपळगाव लेप : सध्या भोपळ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भोपळा अक्षरश: फेकून द्यावा लागत आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी सुनील ढोकळे यांनी भोपळ्याचे पीक जनावरांपुढे टाकून दिले. परिसरातील शेतकरी कांदा लागवडीसाठी वेळोवेळी कांद्याचे रोपे तयार करून लावत होते. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे रोपे सतत खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी भोपळ्याला प्राधान्य दिले. सध्या एक कॅरेटला ३० रुपये भाव मिळत असल्याने तो बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी आपल्या शेताच्या कडेला भोपळे तोडून फेकत आहेत.
(०१ पिंपळगाव लेप) : भाव मिळत नसल्याने शेताच्या कडेला तोडून फेकलेले भोपळे.