घोरवड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:33 IST2019-06-21T01:33:29+5:302019-06-21T01:33:57+5:30
सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटातून जाणाऱ्या मर्सिडीज बेन्झ गाडीला आग लागल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली.

घोरवड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार
देवळाली कॅम्प : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटातून जाणाऱ्या मर्सिडीज बेन्झ गाडीला आग लागल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली.
देवळाली कॅम्प चारणवाडी येथील गुंडाप्पा सुरेश देवकर हे चालक सुनील जाधव याच्यासोबत मर्सिडीज बेन्झ जीएल-३५० (एमएच ०४ इझेड ०९९९) मधून दुपारी सिन्नरकडून घोरवड घाटातून घोटीच्या दिशेने जात होते. यावेळी गाडीमध्ये शॉर्टसर्कीट झाले. चालक जाधव यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.
गाडीच्या पाठीमागील बाजूस येऊन देवकर व जाधव बघत असताना अचानक गाडीने पेट घेतल्याने गाडीची पाठीमागील बाजू व पुढील बाजूचा बहुतांश भाग आगीत जळून खाक झाला. सिन्नर अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवली.