वटार येथे चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:56 PM2018-01-18T14:56:28+5:302018-01-18T14:56:57+5:30
वटार : बुधवारी रात्री दोनच्या सुमारास रूक्मागंद मन्साराम बागुल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वटार : बुधवारी रात्री दोनच्या सुमारास रूक्मागंद मन्साराम बागुल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बागुल हे नाशिक येथे कामानिमित्ताने गेल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. सर्व गांव रात्री दोनच्या सुमारास झोपले असताना चोरट्यांनी फायदा उचलत दोन पल्सर गाडीवर २५ ते ३० वयोगटातील सहा तरु ण तोंडाला फडके बाधून आले. सागाचा दरवाजा असल्याने टामिच्या सह्याने कुलूप कोनके तोडून घरात शिरले. घरात शिरून घरातील सर्व समान अस्ताव्यस्त करून फेकले पण हाती काही लागले नाही. शेवटी घरतील कोठीला कुलूप असल्याने ती चावी शोधून कोटी पाहिली तर तिथही काही मिळाले नाही. नंतर घरातील सामानावर मोर्चा वळवत ते सर्व फेकून देत अस्तव्यस्त करत, घरात कोणत्याही प्रकारची रोकड रक्कम न मिळाल्याने पळ काढावा लागला. घरातून पळत असतांना जवळच्या बाई जाग्या झाल्या. चोरट्यांच्या गाड्या पाहून त्या घाबरल्या. त्यानंतर गावातील बरेच नागरिक झागे झाले पण तोपर्यंत चोरचे वेशी पार करून पसार झाले होते. सकाळी हे वृत्त पोलिस स्टेशनला सरपंच कल्पना खैरनार यांनी कळवले. पोलिस रविंद्र भामरे व बागुल पोलिस यांनी पाहणी करून घेतली. यावेळी पोलिस पाटील किरण खैरनार, जिभाऊ खैरनार, हरिचंद्र खैरनार व गावातील नागरिक उपस्थित होते.