शिवजयघोषाची गगनभेदी गर्जना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:02+5:302021-02-20T04:42:02+5:30
नाशिक : शिवभक्तांनी शिवजयघोषाची गगनभेदी गर्जना देत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ वी जयंती जल्लोषात साजरी ...
नाशिक : शिवभक्तांनी शिवजयघोषाची गगनभेदी गर्जना देत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ वी जयंती जल्लोषात साजरी केली. शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहरात भगवे झेंडे व पताकांमुळे संपूर्ण नाशिक शहरत शिवमय झाले असून चौकाचौकात शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्यांचे सूर कानी पडत असल्याने शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले.
नाशिक शहरात पारंपारिक मिळवणूक होऊ शकली नाही. मात्र, शहरातील शिवप्रमींनी अभूतपूर्व वातावरणात संपूर्ण दक्षता घेत शिवप्रेमींनी विविध सामाजिक उपक्रम राबवुन शिवरायांना अभिवादन केले. तरुण शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाजांचा जयघोष करीत शहरातून चारचाकी , दुचाकी वाहनांची रॅली काढून जल्लोष साजरा केला. तर सिन्नर फाटा ते सातपूर ते द्वारका आणि विल्होळी ते आडगावसह शहरातील रविवार कारंजा, घनकर लेन, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, कॉलेडरोड, भद्रकाली, दूधबाजार, दहीपूल, जुने नाशिक , मखमलाबाद नाका, पंचवटी , दिंडोरीरोड. इंदिरानगर, उपनगर परिसर शिवजन्मोत्सवाच्या मोठ मोठ्या फलकांनी फुलून गेल्याचे दिसून आले. शिवजन्मोत्सवात अबाल वृद्धांनी सहभागी होत ठिकठाकाणी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. अनेक ठिकाणी चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदविला. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परीधान करीत भगवे फेेटे बांधून जन्मोत्सव साजरा केला. दरम्यान, पालकमंत्री छगन भूजबळ यांनी शहरातील विविध शिवजंयती उत्सव मंडळांच्या कार्यक्रमांना भेट देऊन शिवप्रेमींच्या उत्साहात भर घातली ,तर शालीमार चौकात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचवटीतील संयुक्त शिवजयंची समितीने किल्ला साकारला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वंदन करून पुष्पहार अर्पण केला.
इन्फो-
मर्दाणी खेळांची प्रात्यक्षिके
जूने नाशिक शिवजयंती उत्सव समिती मार्फेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील तरुण तरुमींणी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या चित्त थराराक प्रात्यक्षिकांना शिवभक्तांनी दाद देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.
इन्फो
सिडकोत अश्वारुढ पुतळा
मिरणुक बंदी असल्याने एकाच जागेवर कोरोना प्रतिबंदात्मक नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिडकोतील सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीने अश्वारुढ पुतळ्याचा देखावा उभारला आहे. पुतळा शिवभक्तांचे लक्षवेधून घेत आहे.
इन्फो
लक्षवेधी देखावा
मखमलाबाद नाका येथे राज माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना शेतीची मशागत आणि शेतीविषयी माहिती देतानाचा देखावा साकारण्याचा आला होता. या देखाव्याला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या ठिकाणी येणारे शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
इन्फो-
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी शिवरायांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यात नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीने रात्री बारा वाजता महाआरती केली. तर लेखानगर सकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुजा व महाआरती करून ३९१ किलोचे अकरा हजार लाडू वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनशने सामनगाव येथील वृद्धाश्रामत फळाचे वाटप केले तर शिवसक्षम फाउंडेशनतर्फे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
इन्फो-
पारंपारिक वाद्याच्या तालावर ठेका
शहरात मुख्य मिरवणूक होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी चौकाचौकातील जन्मोत्सव सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावली . यात पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, अशोक स्तंभ अशा ठिकाणी ढोल ताशासारख्या पारंपारिक वाद्य पथकांनी काहीवेळ हजेरी लावून वादन केले. यावेळी उपस्थितांनी पारंपारिक वाद्याच्या तालावार ठेका धरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परीसर दणानून सोडला.
===Photopath===
190221\19nsk_59_19022021_13.jpg
===Caption===
पारंपारिक वाद्याच्या तालावर ठेका धरताना तरुणाई