अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:21 AM2018-12-22T01:21:21+5:302018-12-22T01:21:43+5:30

नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.

 The thunderstorm on the last day | अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

Next

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.
प्रगती पॅनलने शहरातील रामवाडीपूल ते निमाणी आणि सहकार पॅनलने नाशिकरोड व्यापारपेठेत फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. तसेच जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात चांदवड, नांदगाव, लासलगाव येथे प्रचार केला. नम्रता पॅनलने तीन मोठ्या कारखान्यांच्या कामगारांना भेटून मतदानाचे आवाहन केले.
तीन तुल्यबळ पॅनलच्या दावेदारीमुळे नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली आहे. या बॅँकेसाठी तिन्ही पॅनल्सने बॅँकेच्या कार्यक्षेत्रांतील सर्व शहरे आणि तालुक्यात प्रचार केला. जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, जळगाव, पुणे-मुंबई तसेच सुरतसह अन्य जिल्ह्णांतदेखील प्रचार करीत सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा उडवून दिला. आता शहरावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून ज्या तालुक्याचे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांनी त्या त्या भागात प्रचार केला. सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलची प्रचाररॅली सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट येथून काढण्यात आली. तेथून गंगावाडी, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, शालिमार, नेहरू गार्डन, महात्मा गांधीरोड, वकीलवाडी, अशोकस्तंभ, रविवार पेठ, मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, पेठफाटा, मखमलाबाद नाका, रामवाडीमार्र्गे निमाणी मंगल कार्यालय येथे येऊन तेथेच सांगता करण्यात आली. यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार सहभागी झाले होते. व्यापाºयांना प्रचारपत्रके वाटप करून भूमिका पटवून देण्यात आली. यात हेमंत धात्रक, शिवदास डागा, प्रकाश दायमा, अविनाश गोठी, कांतीलाल जैन, महेंद्र बुरड, गणेश गिते, भानुदास चौधरी, हरिश लोढा, सुभाष नहार, नरेंद्र पवार, अशोक सोनजे, रंजन ठाकरे, प्रफुल्ल संचेती तसेच महिला राखीव गटातील उमेदवार शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, अनुसूचित जाती-जमाती गटातील उमेदवार प्रशांत दिवे आदी तसेच पॅनल समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते. शनिवार (दि.२२) प्रचाराचा एक दिवस शिल्लक असला तरी प्रगती पॅनलने लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता मान्य करून प्रचाराची सांगता केली आहे.

Web Title:  The thunderstorm on the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.