थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

By Admin | Published: October 20, 2015 11:55 PM2015-10-20T23:55:24+5:302015-10-20T23:55:51+5:30

थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

Thunderstruck; Crowd for dandiya | थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

googlenewsNext

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंचवटी परिसरात ठिकठिकाणच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा-दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजेनंतर पंचवटीतील नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी युवक-युवतींसह महिला वर्ग दांडिया खेळण्यासाठी, तसेच गरबा नृत्य करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याने नवरात्रोत्सवाची धूम वाढली आहे. डीजे साउंडवर मराठी, हिंदी तसेच गुजराथी गाण्यांवर ठेका धरत दांडियाप्रेमी दांडिया खेळण्याची मजा लुटत आहेत. आपल्या मंडळाच्या ठिकाणी दांडियाप्रेमींची दांडिया व गरबा खेळण्यासाठी गर्दी व्हावी, यासाठी मंडळांतर्फे दैनंदिन बक्षीस योजना सुरू करण्यात आली असून, यात लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या दांडिया खेळणाऱ्यांना रोख रक्कम, तसेच चषक स्वरूपात पारितोषिक दिले जात आहे. परिसरातील काही मंडळांकडून देवीच्या आरतीसाठी राजकीय, तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केले जात आहे. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी यंदा डीजे साउंडसह आकर्षक कमान, तसेच विद्युत रोषणाई केल्याने दांडिया खेळला जाणारा परिसर सायंकाळच्या सुमाराला उजळून निघत आहे. परिसरातील जुने मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार चौक, सेवाकुंज येथील श्री सप्तशृंगी मित्रमंडळ, हिरावाडीतील एस. एफ. सी. फाउंडेशन, कै. दत्ता मोगरे प्रणित दुर्गा फ्रेंड सर्कल, अयोध्यानगरी मित्रमंडळ आदिंसह पंचवटी गावठाण, मेरी, म्हसरूळ, दिंडोरीरोड, पेठरोड, आडगाव, मखमलाबाद परिसरातील मित्रमंंडळांनी दांडियाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Thunderstruck; Crowd for dandiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.