गुरुवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:14 AM2019-12-25T00:14:31+5:302019-12-25T00:29:41+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र नियोजित कार्यक्रमामुळे येणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाची धावपळ उडाली असून, मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाºयांची मुदत येत्या २ डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वीच त्यांच्या कार्यकाळात या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात यावे, असा आग्रह पदाधिकाºयांनी धरला होता.
प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आता हा सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह काही पदाधिकाºयांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजीमंत्री दादा भुसे आदींना निमंत्रण दिले. त्यानुसार गुरुवारी सोहळा घेण्यात येणार आहे. खाते प्रमुखांची बैठक या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाची तयारीसाठी धावपळ उडाली असून, वेळेअभावी निमंत्रण पत्रिका वाटप करणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्य व निमंत्रितांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. मंगळवारी सायंकाळी सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला तसेच सोहळ्यात कुठलीही कमतरता भासणार नाही, अशा सूचना केल्या.