पहाटे स्फोटाने हादरलेल्या तिबेटियन पालिका बाजारात दुपारी गुंडांचा धिंगाणा; दुकानांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:29 PM2017-10-07T16:29:24+5:302017-10-07T16:31:09+5:30
दुपारी काही गुंडांच्या टोळक्याने परिसरात धुडगूस घालून तिबेटियन बाजार परिसरातील रस्त्यावर कॅनडाकॉर्नरच्या दिशेने सुरू असलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या तिबेटियन पालिका बाजार जोरदार स्फोटाने हादरला. येथील नऊ दुकाने या शक्तीशाली स्फोटाने उध्दवस्त झाली. गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केले असले तरी स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या भागातील खाद्यपदार्थांचा व्यवसाय पोलिसांनी बंद ठेवला होता; दरम्यान दुपारी काही गुंडांच्या टोळक्याने परिसरात धुडगूस घालून तिबेटियन बाजार परिसरातील रस्त्यावर कॅनडाकॉर्नरच्या दिशेने सुरू असलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे स्फोटामुळे या परिसरात सकाळपासून पोलीस बंदोबस्त कायम असून पोलीस उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील पालिका बाजारात गुंडांच्या टोळीने घातलेला धिंगाणा हा एकप्रकारे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा असल्याचे बोलले जात आहे. एकूणच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या इमारतीच्या खाली तळ मजल्याला लागून ्रअसलेली चाट विक्रीची दुकाने, डोसाविक्रीच्या दुकानांचे नुकसान केले.