मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:47 PM2018-10-10T22:47:03+5:302018-10-10T22:53:27+5:30

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Tiger was elected president of labor union | मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

Next
ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी आशाताई चव्हाण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा मजूर संघाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कासव व उपाध्यक्ष प्रमोद भाबड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.
अध्यक्षपदासाठी कळवणचे हरिभाऊ वाघ यांच्या नावाची सूचना संपतराव सकाळे यांनी मांडली. तिला योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांच्या नावाची सूचना संभाजी पवार यांनी मांडली. शिवाजी रौंदळ यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निर्धारित वेळेत एकेक अर्ज दाखल झाल्याने वाघ व चव्हाण बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी केली. संघाच्या वतीने यावेळी हरिभाऊ वाघ, आशाताई चव्हाण, मावळते अध्यक्ष शिवाजी कासव, प्रमोद भाबड, प्रेरणा शिवदास यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील प्राथमिक मजूर सहकारी संस्थाच्या हितासाठी, संवर्धनासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, मजूर संस्थाना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ वाघ यांनी सत्काराप्रसंगी दिली. यावेळी संपतराव सकाळे, शिवाजी कासव, प्रतिभा शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.
निवडीप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा पाटील, मजूर संघाचे संचालक राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, योगेश हिरे, दिनकर उगले, संभाजी पवार, नीलेश आहेर, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंशी, योगेश गोलाईत, सुरेश भोये, विठ्ठल वाजे, शशिकांत आव्हाड, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंभळे, प्रतिभा शिरसाठ, रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते.कळवणची परंपरा कायमजिल्हा मजूर संघाच्या कळवण तालुका संचालकपदासाठी आतापर्यंतच्या निवडणुका लाखमोलाने चुरशीच्या केल्या आहेत. त्यामुळे कळवणमधून संचालक झालेला मजूर संघाचा प्रतिनिधी जिल्हा संघावर पदाधिकारी होतो, ही गेल्या २५ वर्षांची परंपरा यंदा हरिभाऊ वाघ यांनी कायम ठेवून कळवणकडे अध्यक्षपद खेचून आणले. याआधी अंबादास अहिरराव (१९७७-७८), केदा अहेर (२०००-०१), शरद गुंजाळ (२००८-०९) यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तसेच कौतिक पगार, रवींद्र देवरे, योगेश पगार व संगीताताई देवरे यांनी उपाध्यक्षपद भूषविले आहे.

Web Title: Tiger was elected president of labor union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक