वाघच ठरवणार कोणाशी मैत्री करायची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:32+5:302021-06-11T04:11:32+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी नाशिक विभागाच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. ...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी नाशिक विभागाच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. शिवसेनेचे लक्ष विधानसभेच्या निर्भेळ यशाकडे असून, विधानसभेत शंभराच्या पुढे आमदार यावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाकाळात संपर्क दौरे करता आले नसल्याने आता आपण दौरे सुरू केले असून, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा करीत असल्याचे ते म्हणाले. सर्वच पक्ष आपले बळ वाढवत असते तसेच नेतेही दौरे करीत असतात. महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यानुसार काम करीत असल्याचे ते म्हणाले.
अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील पंतप्रधानांच्या प्रचाराबाबत बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यांनी पक्षीय प्रचार करू नये असे मत व्यक्त केले होते. मोदी हे भाजपचे तसेच देशाचेदेखील मोठे नेते आहेत. भाजपला त्यांच्यामुळेच यश मिळाले आहे. यापूर्वी भाजपचे कायकर्ते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा वापरत असत. नेत्याचा चेहरा वापरायचा की नाही हे कार्यकर्तेच ठरवत असतात; परंतु पंतप्रधान प्रचाराला जातात तेव्हा पंतप्रधान म्हणून त्यांनी जाऊ नये, असेही राऊत म्हणाले.