टवाळखोरांकडून विविध दहा पक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:25 AM2017-10-29T00:25:40+5:302017-10-29T00:25:45+5:30
इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून झाडांवर दिसणाºया इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
नाशिक : इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून झाडांवर दिसणाºया इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ इको-एको फाउंडेशनच्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हातात गलोल घेऊन शिकार करत असल्याचे दिसले. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्या मुलांशी संवाद साधत त्यांना संशय येऊ दिला नाही. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सुमारे दहा पक्षी मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. सदस्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला कळविली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार व त्यांचे कर्मचाºयांचे पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत टवाळखोरांनी सदस्यांच्या हातांना चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सोनार यांनी घटनास्थळी येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकाºयांमार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अज्ञात टवाळखोरांविरुद्ध वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सोनार करीत आहेत.
वनविभाग करणार जनजागृती
पांडवनगरी परिसरातील ज्या भागात पक्ष्यांची शिकार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्या भागातील रहिवाशांसोबत वनअधिकारी-कर्मचाºयांनी संवाद साधत टवाळखोर कुठल्या भागातील आहे, याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रंगरेज मळा, भय्यावाडी आदी परिसरात वनविभाग जनजागृती करणार आहे.
या पक्ष्यांचा घेतला जीव
तीन लालबुड्या बुलबुल, सुगरण, कबुतर, चिमणी, कोकाटेल अशा जातीचे दहा पक्षी टवाळखोरांकडे असलेल्या पिशवीत आढळून आले. या सर्व पक्ष्यांची शिकार गलोलीने करण्यात आल्याचे पशु वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले. दरम्यान, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या इको-एकोच्या सदस्यांनी त्या टवाळखोरांची अंगझडती घेत त्यांच्याकडून दहा ते बारा गलोल जप्त केल्या आहेत.