कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:02 PM2020-06-15T20:02:36+5:302020-06-15T20:05:55+5:30

नाशिक : येथील एकलहरे विद्युत केंद्र वसाहतीत कोरोना संशयित असल्याच्या अफवांना ऊत आला होता. काही मंडळींनी खातरजमा न करता ...

Tight security in Ekalhare colony due to fear of corona | कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

Next
ठळक मुद्देएकलहरे वसाहतीत सुरक्षा व्यवस्था कडक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सुचना

नाशिक : येथील एकलहरे विद्युत केंद्र वसाहतीत कोरोना संशयित असल्याच्या अफवांना ऊत आला होता. काही मंडळींनी खातरजमा न करता सोशल मीडियावर मेसेज पाठविल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली होती. मात्र सदर रु ग्ण साक्रीचा असून, पत्ता एकलहरेचा दिला असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्या रु ग्णाच्या नातेवाइकाचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने या प्रकरणावर पडदा पडला. मात्र एकलहरेच्या सीमेवर असलेले माडसांगवी, शिलापूर, ओढा या गावांमध्ये कोरोना पॉझेटिव्ह रु ग्ण आढळल्यामुळे येथील वीज केंद्र प्रशासनाने एकलहरे वसाहतीत प्रवेश करणाऱ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. 
वसाहतीबाहेरून  बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नवीन नागरिकांच्या वाहनांची नोंद करून, त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार नंबर, कोणाकडे जायचे इत्यादी माहिती नोंदवून प्रवेश दिला जात आहे. वसाहतीतील रहिवाशांच्या बाबतही नियम कडक करण्यात आले आहेत. वीज केंद्रातील काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक हे लॉकडाऊन काळात परजिल्ह्यात, बाहेरगावी अडकल्याने आता पुन्हा वीज केंद्र वसाहतीत वेळी-अवेळी पूर्व सूचना न देता विनापरवानगी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींना गेटवर आल्यास सुरक्षा विभागाद्वारे प्रवेश दिला जाणार नाही. सदर बाबतीत संबंधित कर्मचाऱ्याने नातेवाईक येणार असल्याचे आपल्या विभागप्रमुखास अवगत करावे. त्यामुळे विभाग प्रमुखास सुरक्षा विभागास सूचना देणे सुलभ होईल. बाहेरून आलेल्या कर्मचारी, नातेवाईक यांनी वसाहतीमध्ये वावरताना सुरक्षिततेकरिता विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा आशयाचे परिपत्रक येथील मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी जारी केले आहे. त्यानुषंगाने त्यांनी गेट नंबर दोनवरील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करून वीज केंद्राच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह मेस्को व गार्डबोर्डच्या सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. यावेळी अधीक्षक अभियंता शशांक चव्हाण, वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक लोंढे, सहायक सुरक्षा अधिकारी भामरे, देवरे, पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Tight security in Ekalhare colony due to fear of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.