ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:21 PM2019-05-11T14:21:08+5:302019-05-11T14:21:18+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसरात दिवसा ढवळ्याही बिबट्याची दहशत वाढली असून या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसरात दिवसा ढवळ्याही बिबट्याची दहशत वाढली असून या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मारूतीचा मोडा परिसरातील शिमटी भागातील वाळीबा काकड यांच्या शेतातील गिन्नी गवतात बिबट्याचे गेल्या दोन दिवसापासून वास्तव्य आहे. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दाणाणून गेला आहे. शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसापासून आपल्या जनावरांना हिरवे गवत देता आले नाही. बिबट्याने गिन्नी गवतात ठाण मांडले असून दिवसा ढवळ्याही गिन्नी गवत कापणे मुश्कील होत आहे. शेतकºयांना दिवसाही शेतात काम करणे अवघड झाले आहे. शेतकरी आपल्या शेतात रात्री अपरात्री काम करतांना टोळक्याने जात असल्याचे चित्र आहे. शिमटी भागात बिबट्याने डरकाळ्यांनी परिसर दाणाणून टाकला आहे. शेतमजूर या भागात कामावर जाण्यासाठी फारसे धजावत नाही मारूतीचा मोडा परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्ष असल्याने बिबटे दिवसभर जंगलामध्येच राहतात व सायंकाळच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ येतात. वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी शिल्लक राहीले नसल्याने बिबटे मानवी वस्तीकडे पाणी व अन्नाच्या शोधासाठी वणवण भटकतांना दिसत आहे. वनविभागाच्या वतीने दिवसा व राञी बिबट्याची डरकाळी आल्यास फटाके फोडण्याचे आवाहन शेतकºयांना केले आहे. शिमटी भागात पिंजरा लावून बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.