कळवणच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:03 PM2020-08-04T22:03:11+5:302020-08-05T00:52:41+5:30
कळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नियमांचे पालन केले, औषधोपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नियमांचे पालन केले, औषधोपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
जुलैअखेर तालुक्यात २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या दरम्यान १२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात १०६ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले होते. सर्वप्रथम कळवण तालुक्यात आढळून आलेल्या ११ वर्षीय बालकात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ९ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ वर्षीय बालक पूर्णत: ठणठणीत झाले होते.
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पहिला रुण लक्षणे मुक्त असल्याने आणि नवीन रुग्ण नाही तसेच संशयितसुद्धा नाही. त्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता. या रुग्णाला कुठलीही प्रवास हिस्ट्री नव्हती. त्याचे वडील शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे त्यावेळी खबरदारी म्हणून संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. शहर व तालुक्यात धाकधूक वाढली असताना रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील तपासणीसाठी पाठवण्यात आलेले सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळवणकरांना मोठा दिलासा मिळाला होता. आमदार नितीन पवार यांच्यासह तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत खैरे, नगरपंचायतीचे तत्कालीन तालुक्यात एकही बाधित नाहीनाशिक शहरासह जिल्हाभरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना जिल्हा सामान्य रु ग्णालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली असून, कळवण तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.शहरात मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांनी प्रशासकीय नियोजन करून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, दक्षता घेण्याच्या सूचना, आरोग्य विभागाकडून परिसराचा सर्वेक्षण, नगरपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात जंतुनाशक फवारणी, परिसर कंटेन्मेंट झोन करून यंत्रणा सतर्क ठेवली आहे.