दळवट वीज उपकेंद्रांला ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांनाही कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:31 PM2018-03-20T14:31:37+5:302018-03-20T14:31:37+5:30
कळवण- दळवट परिसरातील १४ आदिवासी गावे व सात पाड्यावर गेल्या १५ दिवसांपासून वारंवार खंडित होणाºया वीजेच्या खेळखंडोब्यामुळे दळवट परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आदिवासी शेतकºयांनी दळवट उपकेंद्रांला टाळे ठोकून वीज सहाय्यक, आॅपरेटर, कर्मचारी अशा चार चौघांना कोंडत महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, दळवटचे सरपंच रमेश पवार यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले. दळवट परिसरात पाणी असून वीजेअभावी शेतीपिकांना पाणी देता नसल्याने आदिवासी शेतकरी बांधवांनी आक्र मक भूमिका घेऊन गेल्या १५ ते २० दिवसांपासून भेडसावणारी समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेने लक्ष वेधून घेण्यासाठी दळवट वीज उपकेंद्रांवर मोर्चा नेऊन आवारात ठिय्या आंदोलन करु न कर्मचारी व यंत्रणेला कोंडून घातले. आदिवासी शेतकरी वीज ग्राहक वीज बील भरणा नियमित करीत असून सुध्दा वीज वितरण कंपनीकडून नियोजित वेळेनुसार वीज पुरवठा नियमति मिळत नाही. अवघे तीन तीस वीज पुरवठा मिळत होत असून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेती वीज पंपाना पुरेसा आणि मुबलक वीज पुरवठा मिळत नसल्याने कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे गेल्या १५ दिवसात २० शेतीचे वीजपंप जळाल्याची घटना घडली. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असल्याने नुकसान होत आहे. उच्च दाबाचा आणि सुरळीतपणे चार तास वीज पुरवठा मिळावा अशी दळवट परिसरातील आदीवासी बांधवांची मागणी आहे.या आंदोलनात दळवट, मांगलीदर, विरशेत, जिरवाडे, शेपूपाडा, धनोली, बापखेडा, शृंगारवाडी, तताणी, दरेगाव, जामले, शिवभांडणे, कुमसाडी, भांडणे आदी भागातील आदीवासी शेतकरी बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनात शृंगारवाडीचे सरपंच काशिनाथ भोये, प्रभू जाधव , यशवंत पवार, दत्तू गायकवाड, यशवंत चौरे, बाजीराव गायकवाड, काशिनाथ गवळी, मोतीराम गवळी, गंगाधर गवळी, गोविंद वाघमारे, काशिनाथ भोये, हरी जगताप, अंबादास गायकवाड आदी सह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.