१८ वाड्यांची तहान टॅँकर भागविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:58 AM2018-06-20T01:58:31+5:302018-06-20T01:58:31+5:30

नाशिक : मालेगाव तालुक्यामधील १८ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने चार टॅँकरला मंजुरी दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मालेगाव तालुक्यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने चार टॅँकरद्वारे प्रशासनाकडून १८ वाड्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मालेगाव तालुक्यात एकूण १३ टॅँकर धावत आहेत.

Till the thirsty thunders of 18 casters will be provided | १८ वाड्यांची तहान टॅँकर भागविणार

१८ वाड्यांची तहान टॅँकर भागविणार

Next
ठळक मुद्दे चार टॅँकरला मंजुरी

नाशिक : मालेगाव तालुक्यामधील १८ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने चार टॅँकरला मंजुरी दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मालेगाव तालुक्यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने चार टॅँकरद्वारे प्रशासनाकडून १८ वाड्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मालेगाव तालुक्यात एकूण १३ टॅँकर धावत आहेत.
शहरासह जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अद्याप अत्यल्प राहिले असून, जून महिन्याचे अखेरचे दहा दिवस शिल्लक राहिले असताना अद्याप सलग दमदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्या भीषण होत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ टॅँकर गाव-पाडे, वाडे-वस्तीवर धावत होते. यात चार टॅँकरची नव्याने भर पडल्याने टॅँकरची संख्या ९६ वर पोहोचली आहे. मालेगाव तालुक्यासाठी नव्याने चार टॅँकर प्रशासनाने मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळाचा सामना करत असून, या संपूर्ण तालुक्यात सुमारे २४ टॅँकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात ३६२ गावांची तहान टॅँकर भागवित आहे. सिन्नर, बागलाण तालुक्यातही पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये १३ टॅँकर सुरू आहेत.

Web Title: Till the thirsty thunders of 18 casters will be provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.