पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 07:14 PM2018-08-12T19:14:37+5:302018-08-12T19:14:44+5:30

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे.

Time to buy water during rainy season | पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

Next

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी गोदावरी उजवा कालव्याजवळ कोळगावमाळ येथे तलाव करुन वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे वावी व परिसरातील गावांचा टॅँकर बंद झाला होता. मात्र योजना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यत्यय येऊन पाणीपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो. पाणीयोजनेला लागलेले समस्यांचे ग्रहण कायम असल्याने योजनेतील गावांना टंचाईचा सामना करण्याची वेळ येते.
गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील तलावावर विद्युत जलपंपाचे स्टार्टर नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर त्याच दिवशी विद्युत जलपंप जळाला आहे. पाणीउपसा करणारे दोन्ही विद्युत जलपंप जळाल्याने वावी येथील जलकुंभात पाणी आले नाही. तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला असतांना केवळ तांत्रिक कारणामुळे वावीसह कहांडळवाडी, दुशिंगपूर, सायाळे, मलढोण, मिठसागरे, शहा या गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले असतांना वावीसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व कूपनलिका कोरड्या पडल्या आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने योजनेतील हजारों ग्रामस्थांना टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. खासगी टॅँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ वावीसह परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.
पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थांची गैरसोय विचारात घेऊन तातडीने तांत्रिक अडचणी दूर करुन पाणीपुरवठा करण्याची मागणी वावीसह योजने समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Time to buy water during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.