शहरातील भाजीबाजारासाठी वेळेचे निर्बंध आजपासून शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:18 PM2020-04-20T23:18:37+5:302020-04-20T23:18:50+5:30
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. त्यानंतर मनपाने भाजीबाजार तसेच मांसविक्रीसंदर्भातील वेळेच्या बंधनाबाबतचे आदेश मागे घेतले आहेत.
नाशिक : लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. त्यानंतर मनपाने भाजीबाजार तसेच मांसविक्रीसंदर्भातील वेळेच्या बंधनाबाबतचे आदेश मागे घेतले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे शहरात महापालिका अंमलबजावणी करणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अर्थात, सामासिक अंतरासह अन्य निर्बंध कायम राहणार असून, बाधित रुग्ण सापडलेल्या विविध भागातील पाच कन्टेमेंन्ट झोन मात्र भाजीबाजारावरील सध्याची बंधने कायम राहणार आहेत.
मनपाच्या वतीने सहा विभागात खुल्या जागेतदेखील भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी सामासिक अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संचारबंदी कालावधीत दुपारी चार वाजेपर्यंत हे भाजीबाजार सुरू ठेवण्याचे निर्बंध अलीकडेच घातले होते. दोन व्यक्तींमध्ये अर्थात विक्र ेता व ग्राहक यांच्यात किमान एक मीटर अंतर राहील व दोन दुकानांमध्ये पाच मीटर अंतर, तर भाजी मार्केटमधील ओट्यांच्या ठिकाणी प्रत्येक तीन ओट्यांमधील मधला ओटा रिकामा राहील इतके अंतर सोडणे बंधनकारक करण्यात आले होते.
२० एप्रिलपासून आॅरेंज आणि ग्रीन झोनबाबत नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वेळांमध्ये बदल केले असून, वेळेत शिथिलता दिली आहे. त्याच धर्तीवर आयुक्त गमे यांनी सोमवारी (दि.२०) भाजीबाजार आणि मांसविक्र ीबाबचे वेळेचे बंधन काढून घेतले आहे. अर्थात, उघड्यावरील विक्र ीवर बंधने मात्र कायम ठेवली आहेत.