अवकाळी.. निर्यातबंदी, आता कोरोना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:02 PM2020-03-18T22:02:12+5:302020-03-18T22:07:38+5:30
निफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मागील आठवड्यात नांदगाव, नंदुरबार, मराठवाड्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात
बदल घडून आले आहेत. परिसरामध्ये मागील चार-पाच दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे उभी
पिके आडवी होत आहेत. यात शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.
शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच कोरोनामुळे बाजारामध्ये शुकशुकाट निर्माण झालेला आहे.
निफाड तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले, विहीर, तलाव, बोरवेल व इतर उपलब्ध जलाशयांमध्ये मुबलक पाणी आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने हाताला आलेल्या खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान विसरून शेतकºयांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू, उन्हाळी सूर्यफूल, कांदा आदी पिकांची लागवड केलेली आहे. पैकी कांदा व गहू या पिकांची विक्रमी लागवड झालेली आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
त्यातच वाहणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे उभे गव्हाचे पीक आडवे होत आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. विजेचाही खेळखंडोबारात्री गारवा, सकाळी धुके, ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता यामुळे कोणता ऋतू सुरू आहे याचे आकलन होत नाही. दिवसभरातील उन्हाच्या कडाक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीतील गारवा उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. त्यातच विजेच्या भारनियमामुळे शेतकरी हैराण आहेत. दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोमेजून जात आहे. त्यामुळे पुन्हा उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच उपलब्ध होणाºया शेतमालाला दर नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असताना पुन्हा कोरोनाचा फटका आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याला पाहिजे त्याप्रमाणात दर मिळत नसल्याने शेतकरी चिंंतित आहेत.बाजारपेठांमध्ये शुकशुकाटबाजारांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे टमाट्याची आवक वाढल्याने टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करावा लागत आहे. त्यामुळे झालेला खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल झाल्याचे दिसून येत नाही. त्यातच कोरोना व्हायरसमुळे नाशिक जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतमाल विक्र ी करणे अत्यंत जिकिरीचे झालेले आहे. शेतमाल बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणताना झालेला खर्चही फिटत नसल्याने शेतकºयांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट दाटून आलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे.