शेतकऱ्यांना कांदा विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:58 AM2019-11-17T00:58:33+5:302019-11-17T00:59:05+5:30

परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे.

 Time for farmers to buy onions | शेतकऱ्यांना कांदा विकत घेण्याची वेळ

शेतकऱ्यांना कांदा विकत घेण्याची वेळ

googlenewsNext

नायगाव : परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. कांदा रोपांच्या नुकसानीमुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होण्याचे चित्र आहे.
यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने कहर करून शेतपिकांचे अतोनात नुकसान केले. खरिपातील कांद्याचे हजारो हेक्टरवरील पीक नाहीसे झाले आहे. शेतकºयांनी महागड्या दराने कांदा रोपे घेऊन पुन्हा लागवड केली, मात्र परतीच्या पावसाने या कांद्याचेही नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची झाली आहे.
शेतकºयांनी रब्बीच्या कांद्याचे महागडे बियाणे अनेकदा तयार केले, मात्र परतीच्या पावसाने खराब झाले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील कांद्याचेही नियोजन कोलमडल्याने कांदा लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी कांदा पिकाऐवजी अन्य पिकांना पसंती दिली आहे.
गव्हाचे वाढणार उत्पादन
शेतकºयानी कांदा पिकाच्या क्षेत्रात यंदा गव्हाच्या पिकाला पसंती दिल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. येणाºया काळात शेतकºयांही कांदा विकत घेण्याची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर नवल वाटायला नको. यावर्षी शेतकºयांबरोबरच कांदा सर्वांनाच रडविणार, असे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.

Web Title:  Time for farmers to buy onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.