यात्रा रद्द झाल्याने व्यवसायिकांवर उपवास मारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:48 PM2020-12-02T17:48:54+5:302020-12-02T17:50:41+5:30
पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे यंदा येवला तालुक्यातील पिंपळगांव लेपच्या रेणुका देवी यात्रेच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी बंधने पाळली होती. गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक तसेच ग्रामस्थ यांच्या संगनमताने चर्चासत्र घेऊन यावर्षीचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी सारखे होणारे धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. संप्तशृंगी गडावर ज्योत पेटवून मिरवणूक काढण्यातही आली नाही. तमाशा तसेच कुस्ती दंगलीचे ही कार्यक्रम रद्द करण्यात होते.

देवी पुढील सत्यनारायणाची महापूजा ही खंडीत झाली. खेळणी-पाळणीची तसेच मिठाईची शेकडो दुकान आलीच नव्हती. त्यामुळे भविकांचा व महिला वर्गाचा हिरमोड झाला होता. केवळ जेमतेम दोन-तीन दुकानच थाटली असल्याने त्यावरच भविकांनी समाधान मानले. यात्रा रद्द असल्याने दुरवरून यात्रेसाठी येणारे भाविक न आल्याने याचा फटका येथे येणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला.
कोट...
ह्या यात्रेत भेळभत्ताच्या दुकानात दरवर्षी उत्तम धंदा होते. मात्र यावर्षी देवी यात्रा रद्द झाल्याने माझा पंचवीस टक्के धंदा झाला नसल्याने मालासाठी लावलेले पैसे देखील निघणे अवघड आहे. लवकरात-लवकर कोरोना जगातुन निघुन जावा ही देवी चरणी प्रार्थना.
- उत्तम पवार, व्यवसायिक, लासलगाव.