वेळेपूर्वी बँक बंद केल्याने बाचाबाची

By admin | Published: November 14, 2016 12:15 AM2016-11-14T00:15:50+5:302016-11-14T00:18:53+5:30

सायखेडा : नोटा बदलण्यासाठी तीन दिवसांपासून रांगा; पैसे मिळत नसल्याने नाराजी

The time has come to close the bank due to closure of the bank | वेळेपूर्वी बँक बंद केल्याने बाचाबाची

वेळेपूर्वी बँक बंद केल्याने बाचाबाची

Next

 सायखेडा : पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सायखेड्यातील महाराष्ट्र बॅँकेमध्ये ग्राहकांसह नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी तीन दिवसांपासून गर्दी केली आहे. आजही रविवार असून देखील अशीच स्थिती होती. सकाळ पासूनच बॅँकेच्याद्वारावर गर्दी होती.
दररोज चार हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्याने अनेक खातेदार जास्त पैसे द्यावे म्हणून आग्रह धरत होते, तर बँकेत पैसे नसल्याचे कारण दाखून सलग तिसऱ्या दिवशीही बँक कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजताच व्यवहार बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत काही खातेदारांचा वाददेखील झाला. बँकेत शंभर ऐवजी २००० च्या दोन नोटा हातात ठेवल्याने ग्राहकांचा संताप होत होता. दिवसातून अनेकवेळा खातेदार व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. (वार्ताहर)

Web Title: The time has come to close the bank due to closure of the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.