आदिवासी कुटुंबावर बेघर होण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:27 AM2018-02-15T00:27:25+5:302018-02-15T00:28:52+5:30
येवला : घरकुल मजूर झाल्यानंतर परगावाला गेलेल्या आदिवासी कुटुंबाचे घर ग्रामसेवकाने परस्पर दुसºयाला भाडे तत्त्वावर दिल्याने गावी परतलेल्या आदिवासी कुटुंबाला कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कानडी गावामध्ये हा प्रकार घडला. आपले हक्काचे घर दुसºयाने बळकावल्याने रानावनात झोपडीचा सहारा घ्यावा लागत असल्याची तक्र ार संबंधित आदिवासी कुटुंबाने पंचायत समितीकडे केली आहे.

येवला तालुक्यातील कानडी गावामध्ये ज्ञानदेव पोपट खुरसणे व मथुरा ज्ञानदेव खुरसणे यांना पंधरा वर्षापुर्वी कानडी गावामध्ये घरकुल मिळाले होते. त्यात ते राहतही होते मात्र मागील काही दिवसांपूर्वी खुरसणे कुटुंबींयांनी गाव तात्पुरते सोडले होते. गावी परतल्यानंतर आपल्या घरामध्ये दुसरे कोणीतरी राहत असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी ग्रामसेवकाकडे विचारणा केली मात्र त्यांना उलटसुलट उत्तरे देण्यात आली.
सध्या खुरसणे कुटुंबींय गावाच्या माळरानावर वनविभागाच्या हद्दीत एका पाहुण्याकडे झोपडीत राहत आहे. गेल्या तीन चार वर्षापुर्वीपासून त्यांची घरपट्टी थकल्याने त्यांना डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये घरपट्टीचे प्रकरण मिटवावे लागले होते. त्याची पावतीही त्यांच्याकडे आहे.ज्ञानदेव व मथुरा खुरसणे यांना घरकुल मंजूर झालेले होते. सदरच्या घरकुलात इतर लोक राहतात ही बाब त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये याबाबत योग्य ती कार्यवाही करू.
- सुनील अहिरे,
गटविकास अधिकारी, येवला