यंदा बाप्पाची मूर्ती तीन फुटांपेक्षा मोठी नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:12 AM2020-07-07T00:12:28+5:302020-07-07T01:29:26+5:30
यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतला गेला.
नाशिक : यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतला गेला.
कोरोना आजारामुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. तसेच कोरोना आजाराचे संक्र मण रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण गरजेचे आहे. यामुळे येत्या २२ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महानगर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी (दि.६) सकाळी आयुक्तालयाच्या सभागृहात सर्व खबरादारी घेत महानगर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीला उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात यांच्यासह इतर अधिकारी तसेच नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, शंकर बर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव मित्रमंडळांनी जास्तीत जास्त तीन फूट उंचीची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावर्षी मिरवणूक न काढण्याचा, गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे डिजे, ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक रद्द; मुख्यमंत्री सहायता निधीला देणार मदतीचा हात या निर्णयाचे नांगरे-पाटील यांनी यावेळी स्वागत करत पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगला कृती आराखडा तसेच आचारसंहिता तयार करावी. नाशिक शहराचा आदर्श संपूर्ण राज्यापुढे ठेवावा, असेही ते यावेळी म्हणाले. गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांकडून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजनावर भर दिला जाणार आहे. तसेच कोरोनाबाबत समाजात जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.