यंदा मतदारांची मज्जाच मज्जा!
By श्याम बागुल | Published: March 20, 2019 01:40 AM2019-03-20T01:40:06+5:302019-03-20T01:40:28+5:30
एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदान अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिक : एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदान अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच आपल्या तान्हुल्यासह येणाºया महिला मतदारांचे बाळ संगोपणासाठी स्वयंसेवक नेमण्याचे तसेच मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये म्हणून केंद्राच्या आवारात मंडप उभारण्यासह ११ प्रकारच्या सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आयोगाच्या सूचनांमध्ये प्रामुख्याने दिव्यांग मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प उभारण्यात आले आहेत. अशा मतदारांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदारांच्या रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून त्यांची स्वतंत्र रांग तयार करून प्राधान्याने त्यांनाच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर किमान तीनशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवण्यात यावी, पाणी पिण्यासाठी ग्लासही ठेवावा असे आवर्जून सांगण्यात आले आहे. त्याठिकाणी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी व या व्यक्तीने पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी तसेच रांगा लागल्यास रांगेत असलेल्या मतदारांना पाणी वाटप करण्यात यावे. मदत कक्षामार्फत मतदारांना मतदानाच्या चिठ्यांचे वाटप केले जाईल. मतदान केंद्राच्या आवारात पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले असून, त्यातही जर एकच स्वच्छतागृह असेल तर ते महिलांसाठी राखीव ठेवावे व त्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचाºयाची नेमणूक करण्याच्या सूचना आहेत. पुरुषांसाठी जर स्वच्छतागृह नसेल तर तात्पुरते स्वरूपात ते उभारण्यात यावे जेणे करून अडचण निर्माण होणार नाही. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरातून मतदानासाठी आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात येणार आहे.
या शिवाय मतदान केंद्रात विजेची व्यवस्था, वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराचे आरोग्य कीट ठेवण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.
च्मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे याची माहिती होण्यासाठी मतदान केंद्रानजीक दिशादर्शक फलक लावण्यात यावे, त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आवारात स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, मदत कक्ष कोठे आहे याची नकाशाद्वारे माहिती देणारे फलक लावण्यात यावे.
मतदानासाठीदेखील एक पुरुषाने केंद्रात जाऊन मतदान केल्यानंतर दोन महिला मतदान करतील म्हणजेच महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, ज्या महिला बाळासह येतील त्यांच्या बाळाचे संगोपण करण्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्वयंसेवकाला मात्र बालक हाताळण्याचा अनुभव असायला हवा, असे आयोगाने दिलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
च्प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मदत कक्ष निर्माण करण्याच्या व त्याची जागादेखील दर्शनी भागात ठेवण्यात यावी. या ठिकाणी त्या त्या मतदान केंद्रातील बीएलओ बसतील त्यांच्यामार्फत प्रत्येक मतदाराला त्याचे नाव व मतदान केंद्र शोधून देण्याचे काम सोपविण्यात येणार आहे.