अडीच हजार लिटर दूध ओतून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:08 PM2020-05-26T21:08:24+5:302020-05-27T00:03:55+5:30

पांगरी : पांगरी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये दुष्काळावर मात करुन येथील बळीराजाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनास सुरुवात केली आहे. गावात जवळपास सात दूध संकलन केंद्रे असून, दररोज पंधरा ते सतरा हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले, परंतु लाखोंचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला कोरोनामुळे दूध ओतून देण्याची नामुश्की ओढावली आहे.

Time to pour two and a half thousand liters of milk | अडीच हजार लिटर दूध ओतून देण्याची वेळ

अडीच हजार लिटर दूध ओतून देण्याची वेळ

googlenewsNext

पांगरी : पांगरी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये दुष्काळावर मात करुन येथील बळीराजाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनास सुरुवात केली आहे. गावात जवळपास सात दूध संकलन केंद्रे असून, दररोज पंधरा ते सतरा हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले, परंतु लाखोंचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला कोरोनामुळे दूध ओतून देण्याची नामुश्की ओढावली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पांगरी गावात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. परिणामी प्रशासन आणि आरोग्य विभागाची झालेली धावपळ बघावयास मिळाली होती. सदरील रुग्ण पांगरी खुर्द येथील निºहाळे रोड परिसरात वस्तीवर राहत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पांगरी-निºहाळे रस्ता रुग्णांच्या वस्तीजवळ सील करण्यात आला. पांगरी खुर्द गावच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या सील केलेल्या जागेपासून पुढे निºहाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरात राहते. सध्या दुग्धोत्पादन हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असून, या परिसरातून जवळपास अडीच हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते.
दुधसंकलन केंद्रापर्यंत दूध पोहोचविण्यासाठी पांगरी-निºहाळे हा एकमेव मार्ग अस्तित्वात होता, परंतु खबरदारी म्हणून तो बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना माघारी जाऊन पांगरी-मºहळ शीव रस्ता हा पर्याय होता.
या रस्त्याने दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून पांगरी खुर्द येथे पोहोचता येते, परंतु हा शीवा वरील रस्ता मºहळवासीयांनी काटे टाकून बंद केल्याने आज मात्र पांगरी खुर्दच्या उत्पादकांना दूध ओतून देण्याची नामुश्की ओढावल्याची माहिती सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी दिली.
दरम्यान सरपंच मीनाक्षी शिंदे या शीव रस्त्यावरील ग्रामस्थांशी विचार विनिमय करून रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
------------------------------------
मार्ग शोधत मार्गक्रमण
नाशवंत पदार्थ असलेले दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोच होऊ न शकल्याने उत्पादकांच्या दु:खाला सीमा राहिली नाही. पांगरीत कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिसरातील बहुतेक गावांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मार्ग शोधत मार्गक्रमण करावे लागत आहे. नांदुर-मºहळ मार्गे पुणेकर मोठ्या संख्येने येऊ लागल्याने मºहळवासीयांकडून रस्ता बंद करण्यात आला आहे.
--------------------
शासनाने पांगरी खुर्द-निºहाळे रस्ता शीवावर बंद करणे गरजेचे होते. तसेच रुग्णांची वस्ती पांगरी-निºहाळे रस्त्यापासून पाचशे मीटर आतपर्यंत होती. त्यामुळे या वस्तीकडे जाणारा रस्ता सील करणे आवश्यक होते. असे केले असते तर उर्वरित भागातील लोकांना गावापर्यंत सहज पोहोचता आले असते. विनाकरण बारा ते पंधरा किलोमीटरचा फेरा त्यामुळे वाचला असता. प्रशासनाने या गोष्टींचा विचार करुन मार्ग काढावा.
- दत्तू शिंदे, दूध उत्पादक,
पांगरी खुर्द

Web Title: Time to pour two and a half thousand liters of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक