रब्बी पेरणीसाठी पुन्हा हात पसरण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 03:29 PM2020-10-21T15:29:07+5:302020-10-22T00:28:41+5:30
सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.
सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.
अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. गेल्यावर्षीपेक्षाही यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी मोठा खर्च केला होता. पीके सोंगणीला आल्यानंतर आणि काही शेतकºयांनी सोंगणी करु न पीक खळ्यात आणल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला, आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे खरीपाचे उत्पन्न मिळणे बाजूलाच मात्र खरीपासाठी केलेला खर्चही वाया गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
परतीच्या पावसाने सोयाबीन, तूर पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र शेतीत घातलेला खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.
पेरणीनंतर वेळोवळी पाऊस पडत गेल्याने पिके जोमात होती. पेरणी, महागडी औषधे फवारणी यासाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन वाहून गेले तर तूरीचेही मोठे नुकसान झाले. बाजरी, मका आदि पीके पाण्यात गेल्याचे चित्र काही ठिकाणी आहे. अतिपावसामुळे अनेक पीके शेतात सडून गेली आहेत.
मशागतीसाठी उन्हा तान्हात काबाडकष्ट केले. उसनवारीने खरेदी केलेले बी-बियाणे, खतांसाठी रांगा लावल्या. परंतू पावसाने खरिपाची पिके पाण्यात गेली. अशा संकटात शेतकरी पुरते हताश झाल्याचे चित्र आहे.
भुईमुगाला शेंगांचे प्रमाण अत्यल्प
सिन्नर तालुक्यात चांगल्या पावसामुळे भुईमुगाचे पीक जोमात आले. मात्र केवळ पाला वाढला. भुईमुगाला अत्यल्प शेंगा आहेत. तर काही ठिकाणी भुईमुगाला शेंगाच लागल्या नाही. पाहिजे त्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन न झाल्याने शेतकरी नाराज आहे.
सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसामुळे पीकांचे झालेले नुकसान.