नगरसेवकांवर स्वखर्चाने घंटागाड्या चालविण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:15 AM2020-02-07T00:15:07+5:302020-02-07T00:56:38+5:30
घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महापालिकेचा गैरकारभार उघड झाल्याचे सिडको भागात बघावयास मिळत आहे.
सिडको : परिसरात बहुतांशी भागात घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महापालिकेचा गैरकारभार उघड झाल्याचे सिडको भागात बघावयास मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिडको भागातील घंटागाड्या अनियमित येत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पूर्वीच्या ठेकेदाराकडील घंटागाड्या या नागरिकांचा कचरा वेळेवर उचलत नसल्याने तसेच प्रभागात अनियमित घंटागाडी फिरणे यांसह अनेक अडचणींमुळे तसेच मनपाने दिलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांचा ठेका हा गेल्या डिसेंबर महिन्यात रद्द करण्यात आला आहे. यानंतर दुसºया ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला असताना त्याच्याकडूनही सिडको भागातील कचरा उचलण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात असल्याने सिडको भागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलले आहे. याचा त्रास हा नागरिकांबरोबरच सिडकोतील सर्वच नगरसेवकांना होत आहे. यापुढील काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास नगरसेवकांनी प्रभागात स्वत: खर्च करत घंटागाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, नगरसेवक रत्नमाला राणे आणि सुवर्णा मटाले या नगरसेवकांनी तर सध्याच्या घंटागाडीचालकांना डिझेल टाकण्यासाठी पैसे देऊन घंटागाडी सुरू केल्या असल्याने महापालिकेचा कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने मनमानी कारभार केला. कामगार कायद्याचे उल्लंघन करण्यासह इतर कारणांनी त्यांना काळ्या यादीत टाकत त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे.
घंटागाड्या खत प्रकल्पात उभ्या
महापालिकेने संबंधितांचा ठेका रद्द करताना कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना याकडे लक्ष दिले नसल्याने सिडको भागात गेल्या महिनाभरापासून घंटागाडीचा बोजवारा उडाला असल्याचे बघावयास मिळत आहे.
४सध्याच्या ठेकेदाराच्या गाड्यांमध्ये डिझेलच टाकण्यात येत नसल्याने बहुतांशी घंटागाड्या या खत प्रकल्पाच्या ठिकाणी उभ्या असून, यामुळे सिडको भागातील कचरा उचलण्यासाठी मनपाने लवकरच पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
ठेकेदाराने अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने तसेच प्रभागात घंटागाडी अनियमित फिरवणे, कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार न देणे, कचरा न उचलणे या कारणांमुळे मनपाने त्याचा ठेका रद्द करू न त्यास काळ्या यादीत टाकले आहे. परंतु मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते.
- सुधाकर बडगुजर, नगरसेवक