साठवून ठेवलेला कांदा स्वस्तात विकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:02 PM2020-07-25T17:02:38+5:302020-07-25T17:05:11+5:30
मानोरी : उन्हाळ कांद्याला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने स्वस्तात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अद्यापही अनेक शेतकºयांच्या चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने कांद्याला किमान दोन हजार रूपयांच्या पुढे हमीभाव देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गतवर्षी उन्हाळ कांद्याला दहा हजार रु पये प्रति क्विंटल दराने भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा देखील शेतकºयांनी भाव वाढीच्या अपेक्षेने विक्र मी कांदा लागवड केली. मात्र, कमी दरा अभावी मोठ्या प्रमाणात कांदा शेतकºयांनी चाळीत साठवला होता. देशभरात झालेला कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम थेट कांदा निर्यातीवर झाल्याने कांद्याचे भाव आज पर्यंत वधारले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे.
दरम्यान, बांगलादेश सारख्या देशातून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील कांद्याच्या दरात वाढ का होत नाही ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यात यंदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा लवकर खराब होऊ लागल्याने बाजार समित्यात कांद्याची विक्र मी आवक होत आहे. कांदा खराब होऊ लागल्याने कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर ओढवली आहे. त्यामुळे यातून झालेला खर्च फिटणे देखील दुरापास्त झाले आहे.
चार महिन्यापासून भाव वाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले कांदे स्वस्तात विकण्याची वेळ आली आहे. विकलेल्या कांद्यातून झालेला खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा चार महिन्यापासून चाळीत असल्याने खराब होऊ लागला आहे. आता जास्त दिवस कांदे साठवून ठेवणे देखील अवघड होतं चालल्याने स्वस्तात कांदे विकावे लागत आहे.
- स्वप्नील कोटमे, शेतकरी.