संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:04 PM2018-09-22T13:04:51+5:302018-09-22T13:05:03+5:30

खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

 The time of starvation on computer operators | संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ

संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ

Next

खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.गावपातळीवर काम करणाºया या कर्मचार्यांना एक ते दिड वर्षापासुन मानधनच आदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे या केंद्रचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकरी कर्ज माफी, अिस्मता योजनेसाठी ठरलेले मानधन अदा करण्यात आले नाही तर दिनांक २४ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापुढील दहा दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे उपाध्यक्ष राकेश देशमुख कळविले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दरात सेवा देण्यासाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांची उभारणी केलेली आहे. त्यामध्ये मासिक सहा हजार इतके मानधन अत्यल्प मानधनावर केंद्रचालकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतीचे कामकाज, महसुली सेवा, दाखले, उतारे आदी सेवा नागरीकांना पुरविण्याचे कामकाज या केंद्र चालकांकरवी करण्यात येते. परंतु या कर्मचार्यांना त्यांचे ठरविलेले कामकाज सोडुन इतर सर्व योजनांचे कामकाज लादुन करु न घेतले जाते. त्यामुळे दैनंदिन नेमुन दिलेले कामकाज अपुर्ण राहुन नागरिकांना सेवा देणे अवघड होत आहे.
प्रकल्प सुरु होऊन केंद्र चालकांच्या नेमणुकाही झालेल्या आहे परंतु कंपनीच्या बेजबाबदार प्रशासनामुळे दिडर्षापासुन बर्याच केंद्रचालकांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. पंचायत समतिी स्थरावरील संगणक परिचालकाची नेमणुक करणेबाबत शासन आदेश जारी होवुनही नियुक्ती करण्यात आलेली नाही. माहे एप्रील, मे, जुन २०१७ चे मानधन जिल्हा परिषदेकडून कंपनीकडे वर्ग होवूनही केंद्रचालकांचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरील महिन्यांचे मानधन व्याजासहीत मिळावे अशी मागणी संघटनेकडुन होत आहे. ग्रामपंचायतीकडुन जिल्हा परिषदेला प्रति केंद्रचालकाच्या मानधनापोटी मासिक १२ हजार रु पये प्रमाणे वर्षाची रक्कम आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच अदा करण्यात येते. त्यातुन सहा हजार रु पये मानधन या केंद्र चालकांना देण्यात येते. सदरची रक्कम कंपनीकडे जमा असुनही केंद्र चालकांना या मिहन्यांचे मानधन आदा करण्यात आलेले नाही. माहे जुलै २०१८ ते मार्च २१९ पर्यंतच्या रकमेचे धनादेश नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत जमा नसल्याने पुढील मानधन कसे आणि कधी होणार याबाबत शाश्वती नाही.

Web Title:  The time of starvation on computer operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक