नाशिक जिल्ह्यात भाव घसरल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:50 AM2018-11-13T00:50:12+5:302018-11-13T00:50:49+5:30
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे.
पंचवटी : नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटो वाटेतच फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने ते हवालदिल झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रतिजाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्चदेखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
जाळीला ३० ते ४० रुपये दर
जिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आता त्यातच वाढत्या महागाईमुळे शेतकºयावर अस्मानी संकटानंतर आता उभ्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने दुहेरी संकट ओढावले आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत टोमॅटो बाजार गडगडल्याने शेतकºयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शेतात तयार झालेला टोमॅटो विक्रीसाठी बाजारात नेल्यानंतर जाळीला ३० ते ४० रुपये असा मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी तेथेच टोमॅटो सोडून काढता पाय घेत आहे तर काहींना हातात मिळेल ती रक्कम घेऊन समाधान मानावे लागत आहे. बियाणे, लागवड खर्च तसेच वाहतूक भाडेदेखील सुटत नसल्याने यंदा टोमॅटो उत्पादक शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या आदिवासी खेडेगावातील काही शेतकरी बांधवांनी तर शेतातील उभ्या टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केले आहे.