भाव घसरल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 04:05 PM2018-11-12T16:05:49+5:302018-11-12T16:06:10+5:30

गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्च देखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

Time to throw tomato after falling prices | भाव घसरल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ

भाव घसरल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : खुडा करण्याकडे दुर्लक्ष

नाशिक : नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतक-यांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटो वाटेतच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आल्याने ते हवालदिल झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्च देखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या आदिवासी खेडेगावातील काही शेतकरी बांधवांनी तर शेतातील उभ्या टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष करून तयार पिक खुडा करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतांना आता त्यातच वाढती महागाई मुळे शेतकºयावर अस्मानी संकटानंतर आता उभ्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने दुहेरी संकट ओढावले आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत टोमॅटो बाजार गडगडल्याने शेतकºयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शेतात तयार झालेला टमाटा विक्रीसाठी बाजारात नेल्यानंतर जाळीला ३० ते ४० रुपये असा मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी तेथेच टोमॅटो सोडून काढता पाय घेत आहे तर काहींना हातात मिळेल ती रक्कम घेऊन समाधान मानावे लागत आहे. बियाणे, लागवड खर्च तसेच वाहतूक भाडे देखील सुटत नसल्याने यंदा टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

Web Title: Time to throw tomato after falling prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.