युवकाच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण

By admin | Published: February 22, 2016 11:15 PM2016-02-22T23:15:43+5:302016-02-22T23:29:15+5:30

युवकाच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण

The time of youth is read by the time | युवकाच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण

युवकाच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण

Next

 येवला : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराचे नगरसूल येथील युवकाच्या समयसूचकतेमुळे प्राण वाचले.
नगरसूल परिसरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या राजेंद्र नागरे यांच्या शेतात सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हार्दिक नागरे हा युवक शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला असता चार - पाच कुत्रे एका मोराच्या
मागे लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने वडील राजेंद्र नागरे यांच्या
मदतीने मोराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.
कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मोराच्या पायाला जखम झाल्याने हार्दिकने तत्काळ मोराला नगरसूल येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी मोरावर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने त्याने लगेचच राजापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दौड यांना फोन केला. १० ते १५ मिनिटातच दौड घटनास्थळी पोहचले व जखमी मोराला राजापूर वनविभागाच्या दवाखान्यात घेऊन गेले.या घटनाचक्रात हार्दिकच्या मदतीला वडील राजेंद्र नागरे व आजोबा गंगाधर नागरे यांनी मोराचे प्राण वाचविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. (वार्ताहर)

Web Title: The time of youth is read by the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.