मालेगावी ‘टाईम बंँक’ उपक्रमाची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:09 PM2020-02-13T23:09:17+5:302020-02-14T00:46:45+5:30
राजीव वडगे । संगमेश्वर : गेल्या दोन महिन्यांपासून टाईम बॅँक (सेवा बॅँक) या कल्पनेची मुहुर्तमेढ करण्यात आली आहे. मालेगाव ...
राजीव वडगे ।
संगमेश्वर : गेल्या दोन महिन्यांपासून टाईम बॅँक (सेवा बॅँक) या कल्पनेची मुहुर्तमेढ करण्यात आली आहे. मालेगाव नाशिक शहरात या सेवाभावी उपक्रमास सुरूवात झाली आहे. डॉ. वर्धमान लोढा यासाठी स्वत: ठिकठिकाणी जाऊन ही संकल्पना लोकांना प्रत्यक्ष भेटून समजावून सांगत आहेत.
बॅनर, पत्रके, समाजमाध्यमाद्वारे या उपक्रमाचा प्रचार करीत आहे. सदर पदरमोड करुन उपक्रमास सुरूवात केली आहे. नाशिक येथे दहा तर मालेगाव येथे आठ लोकांनी नावे नोंदणी करुन सेवा देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. या सेवाभावी उपक्रमात कुठलाही आर्थिक व्यवहार नाही. निरपेक्ष भावनेने समाजसेवा हाच उद्देश ठेवण्यात आला आहे. आजारी रुग्ण व वयोवृद्धांना त्यांचे ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस करणे, औषधे देणे, त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांचा एकाकीपणा घालविणे व त्यांना एकूणच शारीरिक व मानसिकरित्या धीर देणे हा उद्देश या उपक्रमात ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती मी लोकांना भेटून चर्चा करुन देत असल्याने प्रतिसाद मिळत आहे असे या उपक्रमाचे संचालक व लोढा चॅरिटेबल ट्रस्ट, मालेगावचे अध्यक्ष डॉ. वर्धमान लोढा यांनी सांगितले. नाशिक येथे मेगा रिलिफ पेन क्लीनीक, सुयोजित डेटामॅट्रिक्स ब्लिडींग, मुंबई नाका, नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे वेळेची उपलब्धता आहे. अशा व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतल्यास समाजातील ज्येष्ठांची व रुग्णांची चांगली सेवा देऊन आपला वेळ सत्कार्मी लागण्यास मोठा हातभार लागू शकेल व समाजातील ज्येष्ठांचे एकाकी जीवन सुसह्य होईल. लोढा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मालेगाव येथे जळीत रुग्ण सेवा हा उपक्रम २०१२ पासून सुरू करण्यात आला आहे. या रुग्णालय हॉस्पिटलचा कुठलाही खर्च घेतला जात नाही. म्हणजेच बेड चार्जेस, रुम भाडे संपूर्णपणे मोफत आहेत. फक्त डॉक्टराचे तपासणी शुल्क तेही वाजवी पद्धतीने आकारले जाते. दरवर्र्षी साधारणपणे शंभर जळीत रुग्णांना कमी खर्चात सेवा देण्यात येत आहे. यापूर्वी ट्रस्टने शालेय विद्यार्थ्यांसाठी ओसीया पुस्तक पेढी हा मोफत उपक्रम दहा वर्ष चालविला आहे. तसेच महावीर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातुन नर्सिंग, पॅथॉलॉजी, वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक उपक्रमही राबविला आहे.